भारतात सध्या" शालेय इमारत एक शैक्षणिक साधन" -BALA-(building as learning aid ) ही अभिनव कल्पना रुजत असून त्यासाठी प्रयत्न चालू आहेत.काही तज्ञांचे असे म्हणणे आहे की,भारतातच नव्हे तर इतर देशातही या BALA उपक्रमाचा उपयोग शिक्षणात होईल.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची सुरुवात झाली तेव्हा ज्ञानरचनावाद हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे सर्वच शाळेत राबवण्यात आला. ज्ञानरचनावादामुळे अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मेंदू खूपच active झालेले दिसून आले.आणि आता BALA उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानरचनावादाची राहिलेली कसर नक्कीच भरून निघेल.
BALA उपक्रमाचे सध्या जे वारे वाहते आहे ते जर यशस्वीपणे राबविण्यात आले तर नक्कीच शाळा गोड होतील आणि विद्यार्थी गोडीने शकतील. आम्ही जेव्हा वर्गात ज्ञानरचनावाद फरशीवर उतरवला तेव्हा आमच्या शाळेतील मुले त्याकडे एवढी आकर्षित झाली आणि न समजलेल्या संकल्पना त्यातून मुलांच्या गळी उतरल्या. मुले एवढी active झाली की त्यांच्या डोक्यात आपल्याहून वेगळा ज्ञानरचनावाद रुजायला सुरुवात झाली आणि ते चिमुकले कौतुकास पात्र झाले.
BALA उपक्रम ही ज्ञानरचनावादाचीच पुढची पायरी आहे जेणेकरून प्रशासनाच्या डोक्यातच आता हा BALA शिक्षणाचा activeness घुसला आहे आणि तो या BALA उपक्रमातून आपल्या शाळेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.त्यामुळे आता एक वेगळी" शिक्षण क्रांती"घडल्याशिवाय राहणार नाही. "मराठी शाळेत मराठी पाऊल पडते पुढे "हे आता पूर्णत्वास नेण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली असे म्हणण्यास हरकत नाही आणि ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आता सर्वच मानवी घटकाची असेल यात शंका नाही.
BALA उपक्रमात जी "design Idea" सांगितली आहे ती जर शाळेच्या इमारतीत अंतर्गत व बाह्य जागेत ही "design Idea" उतरवली तर नक्कीच पाठ्यपुस्तकातील काही कठीण असलेल्या संकल्पना समजण्यास मदत होणार आहे. पण ही खर्चिक आणि श्रमिक बाब आहे हेही तितकेच खरे आहे.यापूर्वी प्रत्येक शाळेने लोकसहभागातून आणि स्वखर्चातून ई--लर्निंग,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -ज्ञानरचनावाद, डिजिटल शाळा, शाळाबाह्य मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य इत्यादी बाबीवर बराचसा खर्च केलेला आहे.
2005 च्या खर्चाच्या आकडेवारीनुसार BALA उपक्रमासाठी सांगितलेला खर्च अंदाजे-
1) एका वर्गखोली साठी अंदाजे 8 ते18 हजार
2) तीन वर्ग खोल्यांचा व्हरांडा 9 ते 20 हजार
3) लपाछपी खेळण्याची जागा 8 ते 15 हजार
F4) मातीत व वाळूत खेळण्याच्या जागा 7 ते 15 हजार
5) नैसर्गिक पर्यावरण निर्मिती-1000 मीटर क्षेत्रासाठी 5 ते 20 हजार
6) बाहेर खेळण्याच्या जागा 100 मीटर क्षेत्रासाठी 7 ते 15 हजार
7) एक वर्गीय शाळा व त्याचा परिसर 30 ते 45 हजार
8) दोन वर्गखोल्यांची शाळा व त्याचा परिसर 55 ते 80 हजार
9) तीन वर्गखोल्यांची शाळा व त्याचा परिसर 75 ते 1 लाख 25 हजार असा सांगण्यात आला आहे. आता यासाठी आपल्याला कोण कोणत्या मानवी घटकांची मदत होईल हे सांगणे कठीण आहे.
BALA उपक्रम ही संकल्पना- " एका समृद्ध शाळेचा प्रवास" आणि यात घ्यावयाचे उपक्रम हे वाचताना आणि ऐकताना खूप प्रभावी वाटत आहे पण याचा प्रत्यक्ष प्रवास हा वरील अंदाजे खर्च पाहता कठीणच आहे हे निश्चित.
लातूर जिल्ह्यातील BALA उपक्रमासाठी घेण्यात आलेल्या बैठका तसेच कार्यशाळा तर यशस्वीपणे पार पडत आहेत, पण बऱ्याच जणांचे अनुभव ऐकता राज्य पातळी, जिल्हा पातळीवर, स्थानिक प्रशासन तसेच सहकारी संस्था व सर्वच मानवी घटकांचे शाळेला कशा प्रकारे सहाय्य मिळणार आहे,यावर अवलंबून आहे असे सांगताना दिसतात.
खरे पाहता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात ज्ञानरचनावादाचा प्रवास कुमठे बीट पासून सुरू झाला. तो ज्ञानरचनावाद शाळेत उतरवण्यासाठी 2020 पर्यंतचा कालावधी लागला आणि खूप प्रयत्नातून सर्व मानवी घटकांनी मिळून ज्ञानरचनावादा नुसार शाळेत वर्गखोल्यांची व व्हरांडयाची रंगरंगोटी केली आणि त्यात बदल करून आता BALA ची संकल्पना उतरवणे म्हणजे डोकेदु:खीच म्हणावी लागेल.
ज्ञानरचनावादानुसार शाळा सुरळीत चालू होऊन मुले आता तर कुठे अभ्यासात active झाली होती. त्यातच आणखी " covid-19" चे संकट उद्भवले. यात मुलांचा अभ्यास तर चालू आहे पण ज्ञानरचनावाद मावळून विद्यार्थी Inactive होतानाचे चित्र अनुभवायला मिळत आहे.
नंदा सोनकांबळे
(सहशिक्षिका)
जि. प. प्रा. शा. मुत्तलगाव
ता. उदगीर, जि. लातुर

छान माहिती आहे. शब्द रचना छान आहे.
ReplyDelete