अन्नाप्रमाणेच विद्या सर्वांनाच आवश्यक आहे असा विचार इ.स. पूर्व पाचव्या- सहाव्या शतकात भगवान बुद्धांनी याच भारत देशात मांडला होता. तर कंपनी सरकारने 1813 साली नवी सनद काढून शिक्षणाची दारे सर्वांना खुली केली होती. परंतु येथील चातुर्वणर्य व्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमतेवर आधारित समाज रचनेत एका विशिष्ट समाजाला आणि समस्त स्त्री वर्गाला शूद्र समजून वेदाध्ययनाचा अधिकार नाकारला होता. परंतु महात्मा फुलेंनी स्त्रीला पती,मुलेबाळे,चूल आणि मूल या पलीकडचे जग कळले पाहिजे या विचारातून अस्पृश्य मुलींची शाळा काढून समस्त स्त्री वर्गाच्या शिक्षणाला प्रारंभ केला.
यापुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना असे वाटले की, वैयक्तिक जीवन तत्त्वज्ञानाचा विचार केला तर शिक्षण हे स्त्रीच्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री मुक्तीचे पक्के समर्थक होते कारण त्यांच्यावर भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीचा आणि क्रांतीज्योती महात्मा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणातून, ग्रंथातून,पत्रातून स्त्रियांच्या विकासाला महत्त्व दिल्याचे दिसते. ते म्हणतात कोणत्याही देशाची किंवा समाजाची प्रगती ही त्या देशातील किंवा समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजता येईल म्हणजे ज्या समाजात स्त्रिया पुढे त्या समाजाची प्रगती पुढे ज्या देशातील स्त्रियांची प्रगती झाली त्या देशाची प्रगती झाली असे म्हणता येईल.
बाबासाहेबांना वाटायचं की जर स्त्रिया मागासलेल्या असतील, मागे असतील,शिकलेल्या नसतील, जीवनातील अनेक महत्त्वाच्या पदावर नसतील तर तो समाज आणि तो देश प्रगती पासून दूर असेल. पुरुषांबरोबर स्त्रियांनाही आपले हक्क आवडी- निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. म्हणजेच लग्नानंतर स्त्री ही नवऱ्याची गुलाम न बनता तिला नवऱ्याची मैत्रीण आणि समान अधिकार असणारी सहचारिणी बनता आले पाहिजे याविषयी बाबासाहेबांनी केलेल्या 1942 च्या भाषणात ते म्हणतात - "above all let is girl who marrige stand up to husband claim to be her husband friend and equal and refuse to be selve "
आज आपण मुलींना कुटुंबात आणि समाजात दुय्यम स्थान दिल्याचे पाहतो शिक्षण देतानाही मुलांना पूर्ण शिक्षण होईपर्यंत शिकवले जाते पण मुलींच्या बाबतीत तसे दिसून येत नाही म्हणून शाळेत मुलींच्या गळतीचे प्रमाण जास्त दिसून येते.पण दहावी बारावी किंवा स्पर्धा परीक्षेचा निकाल असेल त्यात मात्र मुलींच्या प्रगतीचा आलेख उंचावलेला दिसतो. डॉ.बाबासाहेब सांगतात आपला देश जर महासत्ता बनवायचा असेल तर ते आपल्याच हातात आहे स्त्री पुरुष समान हक्क आणि मुला-मुलींना समान शिक्षण दिले पाहिजे तेव्हा आपल्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची प्रगती होईल आणि आपला देश महासत्ता बनेल
स्त्रियांच्या प्रगतीसाठी, प्रतिष्ठेसाठी, तिला सन्मानाने जगता यावे म्हणून त्या त्या काळात अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केलेले दिसून येतात.त्यात महत्त्वाचे म्हणजे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करून दिली. आणि याच दारातून अनेक महिला शिकून महत्त्वाच्या पदावर विद्यमान झाल्या. पण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या हक्कांना आणि अधिकारांना घटनेच्या माध्यमातून कायदेशीर रित्या संरक्षण मिळवून दिले म्हणूनच आज आपण पाहतो की, मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या आदिवासी समाजातील स्त्री राष्ट्रपती पदावर विद्यमान आहे आणि म्हणून आता कुठे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील स्त्री आपल्याला पाहायला मिळते आहे.यात शंका नाही.
आज 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 साव्या जयंती निमित्त सर्व समाज सुधारकांना आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून समस्त स्त्री वर्गाला आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देते.
सहशिक्षिका
श्रीम. सोनकांबळे नंदा निवृत्ती
जि प प्रा शा वाकसा
ता. निलंगा जि. लातूर
मो. नं.7038219211

No comments:
Post a Comment