Wednesday, November 25, 2020

भारतीय संविधानाच्या काही ठळक बाबी

 


26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जाणारा दिवस म्हणजे संविधान दिन किंवा  त्याला विधि दिन असे आपण म्हणतो. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा  समिती स्थापन करण्यात आली. मसुदा समितीने चर्चासत्रे व बैठका यांचे आयोजन करून अंतिम मसुदा तयार केला. संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा मसुदा स्वीकारला. त्यामुळे देशभर 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.



               24 नोव्हेंबर 2008 ला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 26 नोव्हेंबर हा  संविधान  दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश काढला आणि तशी घोषणाही केली.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या   125 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली म्हणून पहिला अधिकृत संविधान दिन 26 नोव्हेंबर 2015 रोजी साजरा केला. याचा मुख्य हेतू म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जनजागृती तसेच प्रचार व प्रसार व्हावा असाच आहे. भारतीय संविधानाचा अभ्यास करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.



1) संविधानाला भारतीय संसदेत 26 नोव्हेंबर 1949 ला मान्यता देण्यात आली.

2) संविधान सभेने संविधान 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात पूर्ण केले.

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एन  गोपाल स्वामी अय्यंगार, के एम मुन्शी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन माधवराव,टी. टी. कृष्णम्माचारी,  सहिद मोहम्मद सादुल्ला यांची  29 ऑगस्ट1947 ला मसुदा समिती स्थापन झाली होती आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मसुदा समितीच्या  11बैठका आणि44 सभा झाल्या.

4) मसुदा समितीने तयार केलेला मसुदा संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 ला मान्य केला.

5) संविधान सभा 9 डिसेंबर 1946 रोजी स्थापन करण्यात आली होती या सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा होते आणि पुढे डॉ.राजेंद्र प्रसाद 11 डिसेंबर 1946 ला अध्यक्ष झाले.

6) भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधानाच्या मूळ प्रतीत  395 कलमे,   8 अनुसूची,  22 भाग आणि एक उद्देशिका  आहे.

7) संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 32 मूलभूत अधिकारांचा समावेश आहे. संविधानातील कलम 32 म्हणजे संविधानाचा आत्माआहे असे संबोधले जाते.

8) कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीचा पर्याय देण्यात आला आहे काळानुरूप घटनेत काही बदल करावयाचे असल्यास त्याची तरतूद यात करण्यात आली आहे.

9) कलम 36 ते 51 मध्ये  मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे.

10) कलम 21( अ )मध्ये6 ते 14वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

11) मुलभूत हक्कांमध्ये सहा प्रकारचे स्वातंत्र्य समाविष्ट करण्यात आले आहेत.

12) भारताची राज्यघटना  जगातली सर्वात मोठी राज्यघटना असून सर्वात छोटी राज्यघटना म्हणून अमेरिकेच्या राज्यघटनेला ओळखले जाते.

13) भारताची राज्यघटना ही  सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून ओळखली जाते तर इंग्लंडची राज्यघटना ही अलिखीत स्वरुपाची आहे.

14) भारताची राज्यघटना ही जगातली आदर्श राज्यघटना म्हणून ओळखली जाते. या राज्यघटनेचा आधार घेऊन दक्षिण आफ्रिका,  नेपाळ या देशांनीही त्यांच्या देशाचे संविधान तयार केले आहे.



 अशा या महान संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. त्यांनी संविधानाचा मसुदा तयार करून ती संविधान सभेत सादर केला व संविधान सभेने हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला अधिग्रहित व अधिनियमित केले  व 26 जानेवारी 1950 पासून या संविधानानुसार भारताच्या राज्यकारभाराला सुरुवात झाली. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून तर 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.


नंदा सोनकांबळे

(सहशिक्षिका)

जि. प. प्रा. शा. मुत्तलगाव 

ता.  उदगीर,  जि.  लातुर 

No comments:

Post a Comment

टीईटी परीक्षा संदर्भाने

           " गुरुविन न मिळे ज्ञान,             ज्ञानाशिवाय न मिळे जगी सन्मान " " जे मुलांना शिकवतात ते शिक्षक असतात  जे मुलां...