जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लातूर,वर्धा व बुलढाणा,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तसेच मा. ना. प्रा.वर्षाताई गायकवाड मा. मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने" नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020" दिनांक 18 जानेवारी ते 22 जानेवारी 2021 पाच दिवशीय वेबिनार सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे.आज दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी या वेबिनार ची सुरुवात लातूर डाएटच्या डॉ. भागीरथी गिरी मॅडम यांच्या प्रास्ताविकेने झाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याचा उद्देश सांगताना त्या म्हणाल्या की ज्या ज्या नवीन गोष्टी शासनाकडून येतात त्या आम्हाला हव्या असतात. भारत हा विकसनशील देश आहे. त्याला सुपर पावर जर बनवायचा असेल तर एक ऐतिहासिक निर्णय या धोरणात मांडलेला आहे आणि शिक्षण प्रक्रियेत एक नवी दिशा यातून मिळणार आहे. एकविसाव्या शतकातील हे पहिल धोरण जरी असले तरी यापूर्वी 1968,1986,1992 आणि यात सुधारणा करून 2020 च नवीन शैक्षणिक धोरण तयार केलं आहे. एकविसाव्या शतकातील यात कोणता बदल केलेला आहे याची माहिती या पाच दिवसीय वेबिनार मध्ये आपल्याला मिळणार आहे. " राष्ट्रातील भवितव्य शाळेच्या वर्गा वर्गातून घडत आहे" कोठारी आयोगातील या वाक्याची त्यांनी आठवण करून दिली. त्याच बरोबर "नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला केंद्रस्थानी मानून अशा शिक्षण प्रणालीची कल्पना करते की, ती सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करून आपल्या राष्ट्राला सातत्याने न्याय व चैतन्यमय समाजात परावर्तित करण्यात योगदान देते" म्हणजेच आपला भारत देश विकसनशील देश बनवायचा असेल तर मी माझ्या मुलांना कशा पद्धतीने घडवणार आहे याची माहिती, या पाच दिवसीय वेबिनार मध्ये आपण शिकणार आहोत. हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. यानंतर बुलढाणा डायट चे प्रिन्सिपल विजय कुमार शिंदे सर व वर्धा डायटचे प्रिन्सिपल डॉ. मंगेश घोगरे सर यांनीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयी प्रास्ताविक मांडले.
आजच्या वेबिनार च्या मुख्य मार्गदर्शिका डॉ.नेहा बेलसरे मॅडम(MIEPA) यांचा एक आगळा वेगळा परिचय डॉ.भागीरथी गिरी मॅडमनी करून दिला. त्या म्हणाल्या की एखाद्या व्यक्तीचा परिचय काय द्यावा म्हणण्यापेक्षा किती द्यावा अशा या नेहा बेलसरे मॅडम आपल्या महाराष्ट्राच्या भूषण आहेत.
नवीन शैक्षणिक धोरण 2020 याविषयी बोलताना डॉक्टर नेहा बेलसरे मॅडम म्हणाल्या की, " राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 "हे प्रभावीपणे राबवून प्रत्येक घटकापर्यंत प्रभावी माध्यमातून पोचवले तर येत्या वीस वर्षात भारतातील शिक्षण पद्धती मुळातून बदलेल आणि भारत एक जागतिक ज्ञानसत्ता होईल. हे साध्य होण्यासाठी सर्वांनी हातभार लावून त्यात सक्रीय सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी प्रत्येक मानवी घटका समोर ठेवलं आहे. हे करत असताना प्रत्येक मानवी घटकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 समजून घेणे आणि त्याची मांडणी करणं गरजेचं आहे.हे धोरण निर्मिती करण्यामध्ये याचे अध्यक्ष हिसरोचे के. कस्तुरीरंगन आणि त्यांची अकरा जणांची टीम यांनी येत्या वीस वर्षात भारत कसा असला पाहिजे आणि कसा दिसला पाहिजे हा भविष्यवेधी दृष्टिकोन ठेवून हे धोरण त्यांनी विकसन केले आहे. समाजातील सर्व समस्या शिक्षणाने शोधण्याचे कार्य आणि या धो रणातील शिक्षण प्रक्रिया हे भारतीय मूल्यावर आधारीत असेल आणि येणारी पिढी सक्षम होईल.नवीन शैक्षणिक धोरण हे अतिशय प्रागतिक, व्यापक आणि भविष्यवेधी आहे यामध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्प्याचा विचार केलेला आहे. सद्यस्थितीत शिक्षणात काही समस्या वर त्यांनी चर्चा केली यात घोकंपट्टीवर भर, गुण म्हणजे गुणवत्ता हा गैरसमज हे कुठेतरी बदलला पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पाच मूलभूत स्तंभावर आधारित असून त्यात -
1) प्रवेश
2) समता
3) गुणवत्ता
4) परवडणारे
5) उत्तरदायित्व या पाच महत्त्वाच्या मुद्यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. यानंतर प्रचलित शैक्षणिक रचना आणि नवीन शैक्षणिक रचना व यातील स्तर यावरही चर्चा केली. 64 कला आणि 14 विद्या याचाही उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून" शिक्षण मंत्रालय" ठेवणे बाबतचा निर्णय ही त्यांनी सांगितला. ज्ञान भाषा व माध्यम भाषा यावर ही सखोल मार्गदर्शन केले. पाचवीपर्यंत मातृभाषा हेच माध्यम असावं, आणि सहावीपासून व्यावसायिक व कृती शिक्षण रोजगारावर भर,कला-क्रीडा,योग शिक्षण द्यावे. नववी ते बारावी या चार वर्षात 40 विषयाचा अभ्यास करण्याची संधी या धोरणाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.यामध्ये 24 विषयाची परीक्षा सत्र पद्धतीने होईल आणि 16 विषयाचे मूल्यांकन शाळास्तरावर होणार आहे असे त्यांनी सांगितले. (Nios) आणि राज्यातील मुक्त शाळा द्वारे तिसऱ्या, पाचव्या आठव्या इयत्ता साठी खुले शिक्षण आणि प्रज्ञावंताचे शिक्षण यावरही त्यांनी विचार व्यक्त केले. प्रत्येक बालका पर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोचवणे हा शाळा समूहाचा मूळ उद्देश ही त्यांनी सांगितला. तंत्रज्ञान व ऑनलाइन शिक्षण 2020 नवीन शैक्षणिक धोरण आले आणि आता 2040 पर्यंत जगामध्ये कुठलीही शिक्षण पद्धतीही भारत देशा पेक्षा पुढचे असणार नाही त्याच बरोबर आपण जागतिकीकरणा कडे जाताना भारतीय मूल्यं, संस्कृती इत्यादी सोबत घेऊन शिक्षण देणार आहोत त्याच बरोबर पुस्तकाच्या उपलब्धतेबाबत तसेच डिजिटल ग्रंथालय आणि संस्थांचे धोरण यावरही त्यांनी चर्चा केली.
अभ्यासक्रम कमी करणे म्हणजेच कौशल्य आधारितशिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि घोकंपट्टी आधारित शिक्षण कमी करण्यासाठी सन 2020 पर्यंत अभ्यासक्रमात व अध्यापन शास्त्रात बदल करणे तसेच शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा( NcF)व शिक्षक प्रशिक्षणाबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सन 2021 पर्यंत तयार करणे, या धोरणातून आपण आत्मनिर्भर शिक्षणाचे स्वप्न बघत आहोत असेही त्या म्हणाल्या. केवळ पाठांतर करून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचे अवास्तव महत्त्व कमी करून कौशल्य व क्षमता विकसित करण्यावर भर म्हणजेच मूल्यांकन पद्धतीत बदल आणि अध्ययन निष्पत्ती च्या आधारित मुलांचे शिकणे तपासले जाणार आहे. केवळ गुण न नोंदवता क्षमता, कौशल्य विकास,प्रगती पुस्तक, स्थिती नोंदवून सर्वांगीण विकासाला चालना दिली जावी. म्हणजेच वैविध्यपूर्ण पद्धती ने मूल्यांकन केले जाणार आहे.
नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र विषयी बोलत असताना त्यांनी
1) अनुभवात्मक अध्ययन
2) एकात्मिक अध्यापन शास्त्र
3) समवयस्क कातिल अभ्यासास प्रोत्साहन
4) समान महत्त्व
5) दप्तर मुक्त दिन
6) तंत्रज्ञानाचा वापर या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली यानंतर शालेय शिक्षणासाठी मानक निश्चिती आणि अधिस्वीकृती त्याचबरोबर इंटिग्रेटेड पदवी यावरही सखोल मार्गदर्शन केले.
सन 2030 पर्यंत शिक्षक शिक्षणाचे बदल हळूहळू बहू विद्या शाखीय,महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये केले जाईल. यात शिक्षक शिक्षण सुधारणा करणे, शिक्षक भरती आणि नेमणूक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांवर(SEDGS) विशेष लक्ष, इत्यादी विषयाचे नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणातील बदल लक्षात आणून दिले. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील अंमलबजावणीसाठी कालरेषा यातील प्रत्येक बाबींची मुद्देसूद चर्चा केली.
यानंतर डॉ.भागीरथी गिरी मॅडम आणि लातूर डायट चे प्राचार्य डॉ. अनिल मुरकुटे सर यांनी या वेबिनार चे आभार व्यक्त करत असताना मोलाचे मार्गदर्शन केले. खरोखरच महाराष्ट्राच्या भूषण असलेल्या डॉ. नेहा बेलसरे मॅडम यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून आम्हाला प्रेरित केले आहे.त्याबद्दल डॉ.नेहा बेलसरे मॅडम आणि लातूर, वर्धा आणि बुलढाणा टीम यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक विशेष अभिनंदन आणि आभार.
अहवाल लेखन
सहशिक्षिका
श्रीमती नंदा सोनकांबळे
जि प प्रा शा मुत्तलगाव
ता. उदगीर जि. लातूर

No comments:
Post a Comment